लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याबाबत अमित शहांणा पत्र लिहिणार



माय वेब टीम 

पुणे - जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई (ED action on Jarandeshwar sugar factory) हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. याबाबत गृहमंत्री अमित शहांना (Central Home Minister Amit Shah) पत्र लिहिणार असून लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी (Factory Investigation) करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. (ED action on Jarandeshwar sugar factory) जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याची तब्बल 66 कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत (The sealing of the property was ordered by the ED). त्याबाबत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्य सहकारी बँकेच्या (State Cooperative Bank) माध्यमातून वेगवेगळ्या साखर कारखान्यांना तोट्यात (Factory Loss) दाखवायचं, राज्य सहकारी बँकेने तो लिलाव करून जप्त करायचं आणि ती प्रॉपर्टी 200, 300 कोटींची असेल तर 15 कोटीत करायचं, अशा सर्व कारखान्यांची चौकशी करावी या मागणीसाठी मी आज दुसरे पत्र अमित शाह (Amit Shah) यांना लिहित असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी सांगितले. 200 कोटींच्या प्रॉपर्टीवर 15 कोटीच ऑक्शन आणि त्याच प्रॉपर्टीवर परत 300 कोटीच बँक लोन, त्यामुळे जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे मोठी यादी असून, काहीही काळजी करू नका, सगळी यादी बाहेर येईल, असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post