डोक्यात बिअरची बाटली फोडली



माय वेब टीम 

 अहमदनगर - पत्ते का खेळता, असे विचारल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. केडगाव उपनगरातील बायजाबाई मंदीर रोडवर बुधवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये संकेत रवींद्र आठरे (वय 26 रा. नगर- पुणे रोड, केडगाव) हा तरुण जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे आकाश अशोक पवार (रा. पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव), कार्तिक अशोक नरवडे (रा. मोहिनीनगर, केडगाव) यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी रात्री संकेत आठरे बायजाबाई मंदीर रोडने पायी जात असताना त्यांना आकाश पवार, कार्तिक नरवडे पत्ते खेळताना दिसले. त्यावेळी संकेत याने त्यांना पत्ते का खेळता, लॉकडाऊन चालू आहे ना, असे विचारले असता आकाश व कार्तिक यांना त्याचा राग आला. आकाश याने संकेत यांना कवळीमध्ये पकडले तर कार्तिक याने मोकळी बिअरची बाटली संकेत यांच्या डोक्यात फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक निरीक्षक विवेक पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post