संगमनेरचे पोलीस उपनिरीक्षक माळी निलंबित

माय वेब टीम 

संगमनेर | कर्तव्यात कसूर केल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास अशोक माळी (Sangamner City Police Station Sub-Inspector of Police Rohidas Ashok Mali) यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी (SP Manoj Patil) तडकाफडकी निलंबनाची कारवाई (Suspension action) केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ते वेळोवेळी रजेवर गेले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख (PI Mukundrao Deshmukh) हे नाराज होते. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (Sub-Divisional Police Officer Rahul Madane) यांना माहिती दिली होती. मदने यांनी उपनिरीक्षक माळी Sub-Inspector Mali) यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी दिनांक 15 जुलै रोजी आदेश काढून उपनिरीक्षक माळी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आलेल्या निलंबनाचे आदेशात माळी यांच्यावर विविध प्रकारचे ठपका ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामकाज न करता स्वतःच्या मनाप्रमाणे वागणे, वरिष्ठांनी गुन्हे निर्गती करणेबाबत वेळोवेळी सूचना देऊनही या गुन्ह्याचा तपास न करता वरिष्ठांच्या आदेशाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ड्युटीवर वेळेत न येणे कोरोना उपचाराबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती न देणे करोना काळात रजेवर असतानाही पोलीस स्टेशन गुन्हे प्रकरणाचे कामकाज केल्याच्या नोंदी घेऊन बेकायदेशीर काम कस करणे असा ठपका पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कामकाजाबाबत चौकशी सुरू असून या चौकशीत हस्तक्षेप करता येऊ नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असे या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान पोलिस उपनिरीक्षक माळी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. माळी यांच्याबाबत असणार्‍या भूमिकेमुळे स्थानिक अधिकार्‍यांनी त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रारी केल्याचे चर्चा होत आहे. प्रामाणिक अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे अनेकजण खाजगी बोलत आहे.

 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post