माय वेब टीम
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या राजीनामा उत्तराखंडचे राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज दुपारी 3 वाजता डेहराडूनमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील बैठकीमध्ये राज्याच्या नवीन मुख्यमंत्रीच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर हे डेहराडूनमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे उत्तराखंड विधानसभेची निवडणूक पूढच्या वर्षी होणार असून यासाठी आजचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
सतपाल महाराज आणि रमेश पोखरियाला यांचे नाव आघाडीवर
उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत सतपाल महाराज आणि रमेश पोखरियाल यांचे नाव समोर येत आहे. कारण भाजप आपल्याच आमदारांतून मुख्यमंत्री निवडण्याच्या तयारीत आहे. परंतु, इकडे सतपाल महाराज यांचा पगडा भारी असून या शर्यतीत माजी मुख्यंमत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीदेखील यामध्ये उडी घेतलेली आहे. परंतु, त्रिवेंद्र सिंह यांना आपल्या आमदारांचा पाठिंबा मिळणे अवघड होणार आहे.
Post a Comment