माय वेब टीम
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.
जरे हत्याकांडातील सर्व आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी पवार याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील तसेच फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. रेखा जरे यांना करंजीच्या घाटामध्ये मारण्याचा प्रयत्न आरोपीकडून झाला होता.
यावेळी पवार याचे व इतर आरोपींचे फोन झाले आहेत. पवार याचे इतर आरोपीसोबत संबंध होते. त्याने वेळोवेळी फोन लावून त्यांना माहिती दिली. यामुळे पवार याचे इतर आरोपीसोबत मिलीभगत असल्याचे दिसून येते, असा युक्तीवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला. सदरचा युक्तवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवार याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
Post a Comment