पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, भाजप हा ओबीसींचाच पक्ष


माय वेब टीम 

 मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला होता. त्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डाटा मिळवून द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत. भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे; मग ओबीसींना डावलतो हे कसं? जे भाजपचे शुभचिंतक नाहीत ते अशी टीका करत असतात. ओबीसींची क्रिमिलेयरची मर्यादा पहिल्यांदा आम्ही वाढवून घेतली. ओबीसी मंत्रालय आमच्या कार्यकाळात सुरू झाले. पक्षात आजही अनेक ओबीसी नेते आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

13 डिसेंबर 2019 ला न्यायालयाने आदेश दिला होता की एक आयोग नेमून समर्पित आयोग कार आणि डाटा गोळा करा. तेवढं केलं असतं तरी ओबीसी आरक्षण टिकलं असतं; पण सरकार न्यायालयात तारीख पे तारीख घेत राहिले. शेवटी, ‘तुम्हाला हे आरक्षण द्यायचे नाही’ अशा शब्दांत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लोकमतच्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दरम्यान, राज्य सरकार या विषयावर टाईमपास करीत असल्यानं, मला सीएम करा; मी आरक्षण मिळवून देतो, असं मी उद्विग्नपणे बोललो. मला पुढची 25 वर्षे राजकारण करायचं आहे. आरक्षण देऊ शकलो नाही तर मी राजकीय संन्यास घेईन, असं माझं आव्हान आहे आणि त्यावर मी ठाम आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post