आर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न, BSF च्या फायरिंगनंतर परतले


माय वेब टीम 

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले आहे. पहाटे 4.25 वाजता हे पाकिस्तानी ड्रोन आंतरराष्ट्रीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु BSFच्या गोळीबारानंतर हे ड्रोन परतले. बीएसएफनुसार, हे ड्रोन सीमेवर पाळत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते.

जम्मू भागात 6 दिवसांत ही चौथी ड्रोन ऍक्टिव्हिटी झाली आहे. सर्वात पहिले शनिवारी जम्मू हवाई तळावर ड्रोनने दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले होते. तसेच इमारतीच्या छतालाही नुकसान झाले होते. यानंतर रविवारी रात्री जम्मूमधील कालूचक मिलिटरी तळावरही ड्रोन दिसले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सुंजवान मिलिटरी स्टेशनजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसले होते.

सरकार लवकरच काउंटर ड्रोन पॉलिसी आणणार
सतत सुरू असलेल्या ड्रोन कारवायानंतर सरकार सतर्क झाले असून काउंटर ड्रोन पॉलिसी बनवण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संपूर्ण जम्मू आणि पंजाब विभागात काउंटर ड्रोन सिस्टम कायमस्वरुपी तैनात करण्याची गरज यावर चर्चा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post