माय वेब टीम
पुणे - कोरोनामुळे दिवसेंदिवस लोकांच्या मनात विविध आजारांविषयी भीती तयार होऊ लागली आहे. काही दिवसांपुर्वी शास्त्रज्ञांनी एक नवीन विषाणू विरोधी थेरपी विकसित केली होती. त्यामुळे आता महाभयंकर कोरोना विषाणूला आळा घालता येणार आहे. त्यानंतर आता भारतातही mRNA प्लॅटफॉर्मवर स्वदेशी लस विकसित होत आहे.
पुण्यातील जेनोव्हा फार्मास्युटिकल्स mRNA प्लॅटफॉर्मवरील लस कंपनीने या प्रकारची लस विकसित केली असून, या लशीचे पहिल्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक येत आहेत. HGC019 असं या लशीचं नाव आहे. mRNA प्लॅटफॉर्मवर विकसित केलेल्या लशी कोरोना विषाणूविरोधात सर्वांत प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर सर्वत्र या प्रकराच्या लसीच्या चाचण्या करण्यात येत होत्या.
उंदरांसह इतर प्राण्यांवर घेतलेल्या या लशीच्या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं आहे, की ही लस सुरक्षित आहे. लस दिलेल्या प्राण्याच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यास चालना देण्यात आणि अँटीबॉडी विकसित होण्यात ती हातभार लावते, असं कंपनीने सांगितलं आहे. रोगकारक विषाणू किंवा जिवाणूच्याच जनुकीय घटकांचा वाुालपर करून या लशी विकसित केल्या जातात. त्यामुळे या लसी अधिक परिणामकारक असतात.
दरम्यान, रोगकारक विषाणूचा जेनेटिक कोड लसीच्या निर्माणात वापरला जातो. जेनेटिक कोड माणसाच्या शरिरात गेल्यावर शरीराच्या पेशी विशिष्ट प्रोटिन्सची निर्मिती करतात. शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा ती प्रोटिन्स ओळखते आणि कोरोना सारख्या विषाणूला लक्ष्य करते. सध्या ही लस पहिल्या चाचणीत असल्यानं या लसीचा वापरासाठी पुढच्या वर्षी परवानगी मिळू शकते.
Post a Comment