माय वेब टीम
मुंबई | दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजताची वेळ देण्यात आली तरीही बोर्डाने उत्तीर्ण झालेल्यांची विभागनिहाय सरासरी निकालांची आकडेवारी जारी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात सर्वाधिक 100% निकाल कोकण विभागाचा आला आहे. तर सर्वात कमी असला तरीही नागपूर विभागातील 99.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बोर्डाने जारी केलेल्या सरासरी आकडेवारीनुसार, या वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी 0.02 टक्क्याने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी 99.94% लागला आहे. तर विद्यार्थिनींचा निकाल 99.96% आला आहे. अर्थातच 99.96 टक्के विद्यार्थिनी यावेळी उत्तीर्ण झाल्या आहेत. 27 विषयांचा निकाल 100% आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 97.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
येथून दुपारी 1 वाजता पाहता येईल निकाल
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http: /result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: /result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 2021 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्रेणी सुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Post a Comment