पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव आणि कलागौरव 2020 पुरस्कारांची घोषणा



 शिर्डी | ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhawalkar) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil) साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार (Sahitya Seva Lifetime Achievement Award) देऊन गौरविण्यात येणार आहे. रुपये 1 लाख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पद्मश्री विखे पाटील (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil) राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये 51 हजार व स्मृतीचिन्ह) दिनकर मनवर (Dinkar Manvar) (वाशीम) यांच्या पाण्यारंण्य या कवितासंग्रहास, पद्मश्री विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) सुरेश पाटील (Suresh Patil) (कोल्हापूर) यांच्या पाणजंजाळ या कादंबरीस,अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये 10 हजार व स्मृतीचिन्ह) अशोक लिंबेकर (Ashok Limbekar) (संगमनेर) यांच्या वय कोवळे उन्हाचे या ललित लेख संग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार (रुपये 10 हजार व स्मृतीचिन्ह) डॉ. सोमनाथ मुटकुळे (Dr. Somnath Mutkule) (संगमनेर) यांच्या पुन्हा क्रांतीज्योती व अशोक महाराज निर्मळ (Ashok Maharaj Nirmal) यांच्या एक वेडा नर्मदेकाठी या प्रवास वर्णनपर पुस्तकास देण्यात येणार आहे, असे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Ravsaheb Kasabe) यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती समारंभात साहित्य पुरस्कार देण्याचे हे 31 वे वर्ष असून यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील धर्मकीर्ती सुमंत (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना आणि पद्मश्री विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार पाथर्डी (साधनाचे संपादक) येथील विनोद शिरसाठ (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील गणेश चंदनशिवे (रुपये 25 हजार व स्मृतीचिन्ह) यांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रावसाहेब कसबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.

निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर (निमंत्रक सदस्य) यांनी काम पाहिले.

साहित्य पुरस्कारांचे वितरण हे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी प्रवरानगर येथे संपन्न होत असते. या कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यातून मान्यवर साहित्यीक आणि निमंत्रित उपस्थित राहत असतात. परंतु नगर जिल्ह्यात कोविड संकटाच्या पार्श्वभूमिवर अद्यापही प्रशासनाची सांस्कृतीक कार्यक्रमांवर बंधनं आहेत. त्यामुळे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा कोविडचे निर्बंध शिथील झाल्यानंतर संपन्न होणार असून या कार्यक्रमात दोन्हीही वर्षांचे साहित्य पुरस्कार वितरीत केले जाणार असल्याची माहिती आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post