24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!


 मुंबई | येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत काळ्या ढगांनी दाटी केली आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व विभागात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड परिसरात ढगांची दाटीवाटी झालेली असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

काही दिवसांच्या विश्रांती नंतर मुंबईमध्ये एकदा परत रिमझिम पावसाची सुरुवात झाला असून अनेक ठिकाणी बोरिवली, गोरेगाव मालाड, दादर सायन कुर्ला आणि मुंबई सेंट्रल परिसरातील रिमझिम पाऊस सुरु आहे. सकाळी 4 ते 7 च्या दरम्यान मुंबईत जोरदार पाऊस झाला. अनेक सखल भागांत यामुळे पाणी साचलेलं पाहायला मिळालं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post