बेली फॅटचा धोका! एका महिन्यात घटवण्याची 5 सूत्रे


 

हार्वर्ड मेडिकल हेल्थनुसार बेली फॅट अर्थात पोटाच्या आसपास जमा होणारी चरबी, हे अत्यंत धोकादायक लक्षण आहे. हा इशाराच आहे. वैद्यकीय भाषेत या आरोग्यासाठी घातक चरबीला ‌व्हिसरल फॅट म्हणतात. जास्त चरबीमुळे टाइप-२ मधुमेह, हृदयविकार,एवढेच नव्हे, तर कर्करोगाचीही धोका संभवतो. हे फॅट काही उपायांमुळे घटवता येतात. पुढे दिलेले उपाय तुम्ही महिनाभर अवलंबले तर एका महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल.

१) कॅलरी व्यवस्थापन
५०० कॅलरी जास्त खर्च करा
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. मात्र, जेवढे खाल त्यापेक्षा ५०० कॅलरी जास्त खर्च करा. यास आरोग्यदायी कॅलरी घट म्हणतात.

२) चालण्याचा नियम
आठवड्यातून ३ दिवस तासभर चालणे
यामुळे बेली फॅट आश्चर्यकारकरीत्या घटतात. हाॅर्वर्ड इन्स्टिट्यूटच्या मते, यामुळे त्वचेखालचीच नव्हे, तर उदर पोकळीत लपलेली चरबीदेखील कमी होते.

३) आहाराचे सूत्र
30 टक्के कॅलरी प्रथिनांतून घ्या
चयापचय प्रक्रियेत दिवसाकाठी ८० ते १०० कॅलरी वाढतात.साधारण व्यायाम करणाऱ्याने ५० ग्रॅम अर्थात मूठभर प्रथिने (प्रोटीन) जेवणासोबत घेणे आवश्यक आहे. दही, डाळी, ओट, दलिया आणि ब्रोकोली हे त्याचे उत्तम स्रोत आहेत.

४) पुरेशी झोप
७ तास झोप आवश्यक
कमी झोप किंवा अनिद्रा विकार असणाऱ्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते. झोप न झाल्याने येणारा थकवा भुकेवर परिणाम करतो, शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.

५) व्यायाम अत्यावश्यक
१५ मिनिटे ‘हिट’ एक्सरसाइज
हिट, अर्थात हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग. स्पोर्ट््स न्यूट्रिशनिस्ट डेव्हिड स्टेस यांच्या मते पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post