शिर्डी | सर्वधर्म समभावाने नटलेल्या भारत देशात हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये असलेल्या बंधुत्वाची साक्ष देणारी असंख्य उदाहरणे असून सराला बेट येथे सुरू असलेल्या संत श्री गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास शिर्डी शहरातील मुस्लिम समाज तसेच आझाद ग्रुपच्यावतीने सबका मालिक एक शुभेच्छा यात्रा या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन आणि अनोखी भेट ठरणार असल्याचे प्रतिपादन मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना हाफिज फइम सैय्यद यांनी केले.
श्री गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास सराला बेटावर कोव्हिड नियमांचे पालन करत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. एकादशी निमित्त सप्ताहच्या सातव्या दिवशी 15 कॅरेट केळी मुस्लिम समाजाच्यावतीने बेटावर देण्यात आली आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी शहरात माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाज व आझाद ग्रुपच्यावतीने श्रीक्षेत्र सराला बेटावर सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहनिमित्ताने बुधवार दि.18 रोजी सकाळी शहरातील आझाद चौकात सबका मालिक एक शुभेच्छा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कैलासबापू कोते, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हाफिज फइम सय्यद, मौलाना मन्सुर शेख, उपनगराध्यक्ष सचिन कोते, अॅड. अनिल शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, कैलास आरणे, सलीम बालम शेख, जामा मस्जिदचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार, शमशुद्दीन शेख, भारत शिंदे, अब्दुल शेख, नितीन धिवर, महेमूद सय्यद शब्बीर शेख युनूस शेख, सोमनाथ कडलग, गोरख जाधव, लखू आहिरे, हाज्जूभाई सैय्यद, एजाज पठाण, मुस्ताक दारूवाले, अमजद इनामदार, समीर पठाण, आलीम पठाण रज्जाक शेख, दिलावर शेख, आझाद ग्रुपचे अध्यक्ष शफिक शेख, उपाध्यक्ष अजिम शेख, कार्याध्यक्ष नदिम शेख, ओमकार शिंदे, हसन पठाण, इरफान शेख ,ईरशाद ईनामदार, आय्युब इनामदार, तय्यब सय्यद, महेमूद शेख, आयात मन्सूरी, सोहेब तांबोळी, सईद शेख, अजहर सय्यद आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकादशी निमित्त सप्ताहच्या सातव्या दिवशी 15 कॅरेट केळी मुस्लिम समाजाच्यावतीने बेटावर देण्यात आली आहेत. यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डी येथे पार पडलेल्या अभुतपूर्व सप्ताहमध्ये मुस्लिम समाजाने बहुमोल योगदान दिले असल्याची आठवण करून देत सर्व मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले.
Post a Comment