मुलावर अतिप्रसंगाचा गुन्हा आई-वडिलांची आत्महत्या


 राजुर |  मुलावर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केल्याने व आई वडिलांना सहआरोपी करण्यात आल्याने समाज काय म्हणेल व समाजात बदनामी होईल या भीतीपोटी मुलाच्या आई वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोले तालुक्यातील चिंचावने येथे घडली.

दीपक सोमनाथ कुलाळ (राहणार चिंचवणे तालुका अकोले) यांनी याबाबत राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित युवती व तिच्या वडिलांनी माझा भाऊ व आई वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. केस मागे घेतो पण त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या अन्यथा तुम्हाला केसमध्ये अडकवतो अशी धमकी दिली. गुन्हा दाखल झाल्याचे बदनामीमुळे व केसमध्ये अडकविण्याच्या भीतीमुळे दीपकचे वडील सोमनाथ नामदेव कुलाळ(वय 50) जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45) (रा चिंचवणे, ता. अकोले) यांनी घरात लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांना आत्महत्या करण्यास संबधित युवती व तिच्या वडिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यावरून राजूर पोलिसांनी संबंधित युवती व तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे पोलीस पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास स.पो.
नि.नरेंद्र साबळे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post