बॅालिवूड हादरलं, सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेलला अटक


 

मुंबई | मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचने जुहूमधील एका हॉटेलमधून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रांचने जुहूमधील एका हॉटेलमधून मुंबईतील मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे.

ईशा खान ही महिला बऱ्याच दिवसांपासून मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत होती, अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एक पथक तयार केलं. तसेच क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने बनावट ग्राहक बनून ईशा खानशी संपर्क साधला.

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्या तिघांनाही जुहूमधील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. गुरुवारी रात्री ईशा खान, संबंधित मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच क्राईम ब्रँचच्या टीमने त्यांना अटक केली. कोरोनामुळे जेव्हापासून लॉकडाऊन लागलं आहे तेव्हापासून काम मिळत नाहीये. लॉकडाऊनमुळे ती ज्या मालिकेमध्ये काम करायची ती बंद आहे. त्यामुळे मुंबईत राहण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळेच मी या धंद्यामध्ये आले, असं या अभिनेत्री सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांसमोर सेक्स्टॉर्शनचीही प्रकरणे वारंवार समोर येत होती. कारवाई करताना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीला पकडलं आहे. यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी असल्याचं समोर आलं. यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post