सावधान! डेल्टा प्लस वाढतोय, ‘या’ लोकांना आहे सर्वाधिक धोका!

 


मुंबई | कोरोना विषाणूच्या महामारीविरोधात राज्य दीड वर्षापासून लढत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरूद्ध राज्याने बऱ्यापैकी नियत्रंण मिळवलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. येणारी तिसरी लाट ही डेल्टा विषाणूच्या प्रकाराची आहे. या डेल्टा रूग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसत आहे.

राज्यात आतापर्यंत डेल्टा रूग्णांची संख्या 103 इतकी झाली आहे. राज्यातील 24 जिल्हात आतापर्यंत डेल्टा रूग्ण आढळले आहेत तर, 5 जणांना याविषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे. ज्या रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले होते अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाप्रमाणेच डेल्टा प्लस विषाणूचा जास्त धोका हा को- माँर्बीड ( आधी पासून आजारी असलेले ) यांना आहे. राज्यातील जे 103 रूग्ण आढळले आहेत त्यात 19 ते 60 वयोगटातील 80 रूग्ण आहेत. विशेष म्हणजे को- माँर्बीड आणि लस घेतली नाही अशा रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. डेल्टाच्या रूग्णांची संख्या पाहता त्यात को- माँर्बीड ,कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेले आणि वयोवृद्धांना जास्त धोका आहे.

राज्यातील निर्बंध प्रशासनाने शिथील केले आहेत. यामुळे बाजारात नागरिकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. लस घेवूनही डेल्टा विषाणूची लागण होत आहे. यामुळे बुस्टर डोसची गरज असल्याचं बोललं जात आहे.

 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post