संभाजी ब्रिगेडनं दिलं ‘हे’ चॅलेंज, राज ठाकरे चॅलेंज स्वीकारणार का?


 मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातला वाद चांगलाच शिगेला पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातील जातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.

राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके पाठवणार होते. आता संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना चर्चेसाठी खुलं आवाहन दिलं आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्याकडील सर्व इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांना चर्चेसाठी घेऊन यावं. आम्ही आमच्याकडील बहुजन समाजातील इतिहास अभ्यासक आणि संशोधक चर्चेसाठी यांना घेऊन येऊ. त्यानंतर जाहीर चर्चा करू, असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी केलं आहे.

दरम्यान, या चर्चेमध्ये खऱ्या इतिहासाचं महाराष्ट्राला दर्शन होईल. या जाहीर चर्चेत संदर्भ आणि इतिहासाचे पुरावे सादर होतील. नाहीतर उगाच मुक्ताफळे उधळून राज्याला वेठीस धरू नये, असंही मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post