अहमदनगर | पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका ऑडिओ क्लिपने (Parner Tehsildar Jyoti Devre Audio clip) सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या (Parner) लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिला होता.
या प्रकरणामुळे भाजपला (BJP) मुद्दा मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Devre) यांची भेट घेतली. या भेटीवेळी वाघ यांनी तहसीलदारांना 'रडने का नही, भिडने का' असे म्हणत आलिंगनही दिले. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात (Nilesh Lanke) दंड थोपटल्याचं बोललं जात आहे.
Post a Comment