मुंबई | शिवसेना आणि राणेंमधील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. नारायण राणेंकडून शिवसेनेवर टीका होत आहे तर त्यानंतर सेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर मिळत आहे. मात्र अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
पोस्ट कोविड हा जो प्रकार आहे ते टिकवता आलं पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवणं गरजेचं आहे. मात्र दुर्दैवाने होतं काय तर आजचं जे वातावरण आहे, त्यामुळे मी सावधानतेने पाऊल टाकत आहे. कारण अजुनही कोरोनाचं संकट पुर्णपणे नष्ट झालेलं नाही, त्यामुळे आपण थोडे दिवस थांबायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचं संकट अजुन पुर्णपणे गेलेलं नसून थोडस आहे. काही-काही जुने व्हायरसही पुन्हा परत आले असून कारण नसताना साईट इफेक्ट्स त्याच्यात आणत आहेत मात्र त्या नव्या-जुन्या व्हायरसला नष्ट करायचं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान, काही जण म्हणतील हे उघडं केलं, ते उघडं का करत नाही. काही दिवस थांबा. टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्व उघडं करायचं आहे. एक दिवस हळूवारपणाने मास्कही काढायचा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Post a Comment