“हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत?”



 मुंबई | आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत?, असा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांवर निशाणा साधाला आहे.

असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईवर कारवाई का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?, अशा शब्दांत पडळकरांनी ठाकरे सरकार आणि राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मानी उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post