बापटांचा नारायण राणेंना घरचा आहेर, म्हणाले…

 


मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथव वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनही मंजूर केला. मात्र नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र खासदार गिरीश बापट यांनी राणेंनाच घरचा आहेर दिलाय.

राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर केलं.

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही गिरीश बापटांनी सर्वांना दिला आहे.

मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं गिरीश बापट म्हणालेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post