सोलापूर | देशातील वाढत्या महागाईवरून विरोधक मोदी सरकार टीका करत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र टाकलं आहे. सोलापूरमध्ये घेण्यात आलेल्या युवक मेळाव्यावेळी त्या बोलत होत्या. जनतेने गेल्या वर्षी मोदी सरकार आणि सोलापूर महापालिकेत भाजपला मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं होतं मात्र मोदी सरकार सत्तेत आलं आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला. पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
भाजपवाल्यांनी सोलापूर महापालिकेचं वाटोळं केलं आहे. यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आता युवकांनी पु़ढाकार घेत सत्ताधारी भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चुकीच्या पद्धतीने केलेली नोटबंदी आणि जीएसटीने व्यवसाय बंद पाडले असून युवकांचे रोजगार गेल आहेत. सरकारने लोकांचं जगणं मुश्किलं केलं असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
Post a Comment