अहमदनगर | राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या (Rahuri Co-operative Sugar Factories) संचालक मंडळास एक वर्षाची मुदतवाढ देऊन पुढील गळीत हंगामासाठी (The crushing season) कारखाना सुरू करण्याच्यादृष्टीने सहकार विभागाने स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती खा.डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांना केली.
खा. विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी मंत्रालयात मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांची भेट (Visit) घेऊन राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या (Rahuri Co-operative Sugar Factories) संदर्भात सविस्तर चर्चा (Detailed discussion) केली. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जूनमध्ये संपली आहे. कोव्हीड (Covid 19 )कारणाने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम (Co-operative election program) घ्यायचा नाही असा निर्णय राज्य सरकारचा (Maharashtra Government) आहे. ऑगस्टनंतर याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होणार असल्याने राहुरी कारखान्याच्या समोर पुढील गळीत हंगामाचे मोठे आव्हान उभे असल्याची बाब खा.विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात करावी लागणारी कामे आणि गुंतवणूक याचे निर्णय करावे लागणार असल्याने संचालक मंडळाच्या बाबतीत सहकार विभागाने योग्य मार्गदर्शन करावे अशी विनंती लेखी पत्राद्वारे केली असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले.
Post a Comment