“राज ठाकरेंना भारी प्रसिद्धीची हौस, पवारांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच”

 


पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलीत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचंही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते अकुंश काकडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस आहे. शरद पवार हे शक्तीस्थळ आहे. शक्तीस्थळावर हल्ला करायचा ही पद्धत झाली आहे, अशी बोचरी टीका अंकुश काकडे यांनी केली आहे.

शरद पवारांवर टीका केल्याने आपोआप प्रसिद्धी मिळते, असा टोला अंकुश काकडे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे हे मुंबईत एक, नाशिकमध्ये दुसरंच बोलतात, असा टोलाही काकडेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज्यात जातीयवादी सरकार येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र घेऊन सरकार स्थापन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आणि त्यांची भाऊ बंदकी आहे. महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेनं स्विकारलं आहे, असंही ते म्हणाले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post