मुंबई | कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची कहानी सांगणारा ‘शेरशाह’ चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘शेरशाह’प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकले आहे. या चित्रपटातील एका सीनचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी विक्रम बत्रांच्या भाऊ विशाल बत्रानं एका मुलाखती दरम्यान कारगिलमध्ये सुरू असलेल्या गोळीबारामधला एक किस्सा सांगतिला. विशालनं सांगितलं की, कारगिलमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी एक विचित्र मागणी केली. माधुरी दीक्षित आम्हाला देऊन टाका, अल्लाहची शपथ आम्ही इथून निघून जाऊ. यावर विक्रमनं त्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं.
विक्रमनं उत्तर देताना म्हटलं की, माधुरी दीक्षित सध्या दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे, सध्यातरी यांच्यावरच काम चालवा. यानंतर विक्रम पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडले होते. ज्या सैनिकानं माधुरीची मागणी केली होती त्या सैनिकाला विक्रम यांनी स्वतःच्या हातानं गोळी मारली होती. गोळी मारताना विक्रम सैनिकाला म्हणाले होते, ‘घे माधुरी दीक्षितकडून भेट.’
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात अप्रतिम काम केलं आहे. दोघांचं बॉण्डिंग चित्रपटात अप्रतिम आहे आणि दोघांनी असे अनेक सीन दिले आहेत जे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. दोघांच्या या भावनिक बंधनाचं पडद्यावर खूप कौतुक झालं.
Post a Comment