पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता



मुंबई | कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे तर चिंतेत आणखी वाढ केली आहे. आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत चालत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडला. कोरोना निर्बंधांचे पालन करत अगदी साधेपणानं हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या काळात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनानं पुढील 15 दिवस मुंबईसाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. गतवर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवानंतरच्या 15 दिवसांवर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बरेच लोक मुंबईच्या बाहेर गेले होते. मात्र आता गणेशोत्सव पार पडल्यानंतर पुन्हा ते मुंबईत येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. बाहेरुन येणाऱ्या या लोकांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना काळजी घेण्यास सांगितलं असून पुढील 15 दिवस महत्त्वाचे असल्याचं म्हटलंय आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post