मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. यंदा सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यभरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे राज्यभरात चांगला पाऊस बघायला मिळत आहे. यातच राज्यातही पुढील तीन दिवस मुळसधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, कोकण, मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अशातच राज्य़ात पुढील तीन दिवस सगळीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विशेषतः मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
Post a Comment