मुंबई | आयपीएलच्या दुसऱ्या सत्रास कालपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राॅयल चँलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगळुरूचे फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. त्यानंतर आक्रमक फलंदाजीने कोलकाताने हा सामना केवळ 10 षटकात जिंकला आहे.
प्रथम नाणेफेक जिंकून बंगळुरूने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कोलकाताच्या गोलंदाजींनी विराट कोहलीचा निर्णय फ्लाॅप ठरवला. देवदत्त पेडिकल्ल वगळता इतर कोणताही खेळाडू मैदानात टिकू शकला नाही. कर्णधार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि ए बी डिव्हिलियर्स यांच्यासारखे मोठे खेळाडू झटपट बाद झाले. त्यामुळे बंगळुरूला 19 षटकात केवळ 92 धावा करता आल्या.
बंगळुरूने दिलेल्या 93 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर शुभमन गील आणि व्येंकटेश अय्यर यांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 9 षटकात 82 धावा केल्या. त्यानंतर यजुवेंद्र चहलने शुभमन गीलची विकेट काढली. मात्र तोपर्यंत कोलकाताने सामना खिशात घातला होता. अखेर केवळ 10 षटके राखून कोलकाताने सामना जिंकला आहे.
दरम्यान, कोलकाताकडून वरूण चक्रवतीने 3 बळी घेतले आहेत. तर आंद्रे रसने देखील 3 विकेट काढले आहेत. तर दुसरीकडे शुभमन गील 48 धावा केल्या आणि व्येंकटेश अय्यरने 42 धावांची मोलाची साथ दिली. या सामन्यात वरूण चक्रवतीने मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्यानं त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला आहे.
Post a Comment