अहमदनगर | तलवारीच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक आहे.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. दत्तात्रय अंबादास गोसके हा विनापरवाना व बेकायदा धारदार तलवार स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कटके यांनी तत्काळ पथक पाठवले.
पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, संदीप पवार, संदीप घोडके, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, कमलेश पाथरूड यांनी तात्काळ कारवाई केली. कुंभार गल्लीत शिवसेना कार्यालयाच्या बाजूला एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे फिर्याद दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
Post a Comment