साई मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव साजरा


 शिर्डी | श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिरात काल रात्री 12 वाजता श्रीकृष्णजन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर आज दुपारी 12 वाजता काल्याच्या किर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.

श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते 12 मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे महाराज यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर श्रींची शेजारती झाली.

तसेच काल मंगळवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर मंदिर पुजारी उल्हास वाळुंजकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. किर्तनानंतर 12 वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याहस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदरचा श्री गोकुळाष्टमी उत्सव करोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर भाविकांविना व मर्यादित संस्थान अधिकारी आणि मंदिर पुजारी यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post