पालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात आलीच पाहिजे / कामाला लागा ; श्रीरामपुराच्या बैठकीत ना. थोरात यांची सूचना



 श्रीरामपूर | पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर (Shrirampur) शहर भकास करून ठेवले. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेेसच्या कार्यकर्त्यांनी (Congress Workers) जोमाने कामाला लागावे व श्रीरामपूरची नगरपालिका (Shrirampur Municipality) कोणत्याही परिस्थितीत ताब्यात आलीच पाहिजे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) म्हणाले.

ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) श्रीरामपूर (Shrirampur) दौर्‍यावर आले असता शहरातील नगरसेवक, माजी नगरसेवक व ज्येेष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक पक्ष प्रतोद संजय फंड यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवकांनी श्रीरामपूर शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करून, पालिकेच्या (Shrirampur Municipality) सत्ताधार्‍यांनी श्रीरामपूर (Shrirampur) शहर कसे भकास करून ठेवले व पालिकेतील भ्रष्टाचार याबाबत सत्ताधार्‍यांच्या कार्यपध्दतीचा पाढाच वाचला.

श्रीरामपूर नगरपालिकेवर (Shrirampur Municipality) काँग्रेसचाच झेंडा फडकवणार (flag of the Congress)असल्याची ग्वाही देऊन सर्व ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress Workers) सांगितले. यावेळी ज्येेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी आपापली मते मांडून आगामी पालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला. यावेळी ना. थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

सदर बैठकप्रसंगी आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade), उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane), पक्ष प्रतोद संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रदेश काँग्रेसचे दीप चव्हाण, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, राजन चुग, रमण मुथा, सुनील बोलके, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पा. नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुज्जफर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, शशांक रासकर, रितेश रोटे, मनोज लबडे, सुहास परदेशी, माजी नगरसेवक के. सी. शेळके, कैलास दुबैय्या, सुनील गुप्ता, आशिष धनवटे, मुन्ना पठाण, शाम अडांगळे, सुभाष तोरणे, लक्ष्मण कुमावत, रमजान शाह, सुभाष चव्हाण, भगवान उपाध्ये, सुनील क्षीरसागर, गणेश नाईक, दीपक वमणे, राहुल बागुल, शाहिद कुरेशी, जावेद शेख, युवराज फंड, संतोष परदेशी, राहुल शिंपी, रितेश एडके, मनोज बागुल, डॉ. राजेंद्र लोंढे, गोपाळ जोशी, अतुल वढणे, कृष्णा पुंड आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post