तजेलदार आणि चमकदार चेहरा मिळवण्यासाठी मलायका अरोराने शेअर केले ‘हे’ स्किनकेअर टिप्स

 


डान्स असो, फिटनेस असो किंवा सौंदर्य, प्रत्येकजण मलायका अरोराचा चाहता आहे. मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेस, फिगर आणि ब्युटी टिप्समुळे चर्चेत राहते. तर एकीकडे ४७ वर्षीय मलाईकाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किलच आहे. अशा स्थितीत केवळ महिलाच नव्हे तर तरुणींही तिच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्यास फार उत्सुक असतात. दरम्यान मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे, ती तिची आवडती फिटनेस रेजिमेन आणि ब्युटी टिप्स इन्स्टाग्रामवर शेअर करत. अशातच मलायकाने पुन्हा एकदा तिच्या आवडीच्या स्किनकेअर टिप्स शेअर केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात.

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर स्कीनकेअर संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने चेहर्‍यावर मसाज करण्यासाठी काही तिच्या आवडत्या टिप्स सांगितल्या आहेत. या व्हिडीओ मध्ये ती चेहर्‍यावर ग्वा शा मसाज करताना दिसत आहे. तसेच इनस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना तिने ” माझ्या आवडत्या गोष्टींपैकी ग्वा शा हा मसाज असून आठवड्यातून किमान तीन वेळा तिच्या चेहऱ्यावर मसाज करत असते.” असे व्हिडीओला कॅप्शन देखील दिला आहे.

ग्वा-शा मसाज पद्धत चेहऱ्यावर रोलिंग आणि ड्रेनिंगचा अशा तंत्राच्या आधारे देखील केली जाऊ शकते. त्याशिवाय तुम्ही आपल्या बोटांनी, हाताने मालिश करून किंवा ग्वा-शाद्वारे ज्यात अनेक पद्धती समाविष्ट आहेत त्याने देखील तुम्ही मसाज करू शकता. यामुळे तुमची त्वचा ताजेतवाने दिसते आणि नैसर्गिक चमकसुद्धा मिळते.

ग्वा- शा मसाज ही पारंपारिक चिनी उपचार पद्धतीचा भाग आहे. जे तुमच्या चेहर्‍यावर स्ट्रोक करताना पेटीचिया उघड करण्यासाठी वापर केला जातो. ग्वा-शा टूल्सचे अनेक फायदे आहेत. या टुल्सचा नियमित वापर केल्यानं चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post