राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज


 

मुंबई | हवामान खात्याकडून दरवर्षी मान्सूनविषयी अंदाज बांधला जातो. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं. देशातील बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली देखील आहे. अशातच आता देशातील काही भागात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, तेलगंणा आणि विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबरोबरच अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर किनारपट्टी, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा आणि कोकणात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

आजपासून मुंबई परिसरासह विदर्भात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रात आजापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या मते, सुरुवातीला विदर्भात जोरदार पाऊस पडेल. यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करेल. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post