पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

 


मुंबई | राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मंगळवारी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच राज्यात पुढच्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याकडून राज्यभर पावसाची शक्यता वर्तवली असून येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे. पावसानं पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील पालघरमध्ये रेड अलर्ट तर ठाण्यासह उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारपासून पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली पहायला मिळाली. या जोरदार पावसानं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. बऱ्याच गावांचाही संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, ढगफुटीनं पाथर्डी, शेवगाव आणि अहमदनगर तालुक्यात शेती नुकसान झालं. या तिन्ही तालुक्यांतील अनेक नागरी वस्त्यांना पुराचा वेढा होता. त्यामुळे जनावरे आणि घरासमोर लावलेली वाहने वाहून गेली. मात्र, आता राज्यभर पाऊस असल्यानं लोकांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post