मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळावरून कोकणात जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. डीजीसीएने या चिपी विमानतळाला परवानगी दिली आहे. त्यानंतर काल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमच्या कोकणाचे शक्ती कपूर आणि कोकणाच्या सचिन वाझेंचे भाऊ म्हणजे सिंधूदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य ऐकलं. सिंधूदुर्गात येणाऱ्या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. पण या महाविद्यालाची परवानगी मिळवताना आणि चिपी विमानतळाबद्दल बोलत असताना कदाचित उदय सामंत विसरले असतील, महाविद्यालयाच्या परवानग्या आणि चिपी विमानतळाच्या परवानग्या या डोक्यावर टोप घालण्यासारख्या सोप्या नाहीत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
कोकणातील या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारची परवानगी लागते. त्याला केंद्र सरकारमध्ये ताकद लागते. अरविंद सामंत हे कोकणाचे भूमिपुत्र आहेत. तेही केंद्रात मंत्री होते. मात्र राणे साहेब मंत्री झाल्यानंतरच विमानतळाची परवानगी कशी भेटली. म्हणून घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा केंद्राची परवानगी घेऊन हे दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याबद्दल थोडं आमच्या कोकणातील शक्ती कपुरांनी विचार करावा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, येत्या 9 ऑगस्टपासून या चिपी विमानतळाची वाहतूक सुरू होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित असणार आहेत.
Post a Comment