नवी दिल्ली | सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची योजना ओला कंपनीने आखली आहे. हे चार्जिंग नेटवर्क ‘ओला हायपरचार्जर नेटवर्क’ म्हणून ओळखलं जाणार आहे. ओला कंपनी भारताच्या 400 शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक चार्जिंग पाॅइंट बसवणार असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी सांगितलं आहे. ओलाच्या इलेक्ट्रिकच्या स्कूटरसाठी 15 सप्टेंबर पासून ऑनलाईन बुकिंग सुरू झालं आहे. त्यामुळे ओला कंपनीने एका दिवसात विक्रीच्याबाबतीत मोठी कामगिरी केली आहे.
ओला कंपनीने बुधवारी आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रो या स्कूटरच्या खरेदी विंडो उघडली होती. त्यानंतर कंपनीने आपल्या पहिल्या सेलचे आकडे जाहीर केले आहेत. त्यामुळे ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मदतीने कंपनीने 600 कोटींच्या विक्रीचा आकडा नोंदवला आहे, असं भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
ओला कंपनीच्या एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख तर एस 1 प्रो ची किमंत 1.30 लाख आहे. या स्कूटच्या किंमती एक्स- शोरूमधील आहेत. ओला एस ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज 120 किमी आहे. तर एस प्रोची तीच रेंज 108 किमी आहे. एस 1 प्रो ला मोठी बॅटरी आहे. तर या स्कूटरचा सर्वात वेग हा 115 किमी प्रतितास आहे. ओला एस 1 माॅडेलमध्ये 2.98 आणि एस 1 प्रोमध्ये 3.97 केडब्ल्यूएच बॅटरी देण्यात आली आहे.
दरम्यान, ग्राहकांसाठी एस 1 स्कूटरचा प्रति महिना 2999 रूपयांच्या समान मासिक हप्त्यावर उपलब्ध होईल. तर एस 1 प्रोच्या अॅडव्हान्स व्हर्जनसाठी ईएमआय 3199 रूपयांपासून सुरू होणार असल्याचं ओला कंपनीने 7 सप्टेंबर रोजी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Post a Comment