तृप्ती देसाई यांची बिग बॅासच्या घरात एन्ट्री



 मुंबई | मराठी कलाविश्वातील रियालिटी शो बिग बॉस सर्वात लोकप्रिय शो पैकी एक आहे. कलर्स हिंदीच्या धर्तीवर चालू केलेल्या कलर्स मराठीवर मागील दोन वर्षापासून बिग बॉस मराठी हा कार्यक्रम लोकांच्या भेटीसाठी येत आहे. आतापर्यत बिग बॉसचे दोन सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. त्यामुळे आता बिग बॉस सीजन 3 कधी येणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच आता बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये 15 सेलिब्रीटी असणार आहेत. या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा चर्चेतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होत असतात. 15 सेलिब्रीटी 100 दिवसांसाठी एका मोठ्या बंद घरात राहत असतात. त्यातच आता यावर्षीच्या कार्यक्रमात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत.

या वर्षीच्या सेलिबीटीमध्ये अभिनेत्री सोनाली पाटील, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची, गायत्री दातार, मीनल शाह यांच्यासह किर्तनकार शिवलीला पाटील अभिनेता विशाल निकम, अक्षय वाघमारे यांच्यासह जय दुधाने, संतोष चौधरी, विकास पाटील, आविष्कार दारव्हेकर, उत्कर्श शिंदे हे कलाकार सहभागी असणार आहेत.

दरम्यान, बिग बॉस आजपासून कलर्स मराठीवर दररोज रात्री 9 वाजता किंवा वूटवर लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे आता मराठी प्रक्षकांना बिग बॉसची आतुरता लागली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post