‘बिग बॉस’च्या घरात कलाकारांबरोबर किर्तनकारही पाहायला मिळणार, वाचा सर्व स्पर्धकांची यादी

 


मुंबई | कलर्स मराठी वाहिणीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मराठीचं तिसरं पर्व सोमवारी सुरू झालं आहे. दरवेळीप्रमाणे बिग बॉसच्या घरात यावेळी कलाकार स्पर्धक तर सहभागी झालेच आहेत. परंतु त्याबरोबरच आता बीग बॉसच्या घरामध्ये किर्तनकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे. यामुळे आता या पर्वात वेगळा तडका पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात कोण स्पर्धक असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. स्पर्धकांच्या नावांविषयी अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र, आता ही उत्सुकता संपली आहे. बिग बॉसच्या या पर्वातील पंधराही स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

अभिनेत्री सोनाली पाटील, अभिनेता विशाल निकम, गायक उत्कर्ष शिंदे, अभिनेत्री स्नेहा वाघ, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, अभिनेता अविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, अभिनेत्री गायत्री दातार, अभिनेता विकास पाटील, अभिनेता जय दुधाणे, अभिनेत्री मीनल शहा, अभिनेता अक्षय वाघमारे,संतोष चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या या पर्वात सहभागी झाले आहेत.

हे पर्व देखील शंभर दिवसांचं असणार आहे. आता शंभराव्या दिवसापर्यंत या पंधराजणांपैकी घरात कोण टिकतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु पुढचे शंभर दिवस बीग बॉसच्या घरात भरपूर ड्रामा, मनोरंजन, भांडण आणि बरंच काही पहायला मिळणार हे मात्र नक्की.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post