‘उद्धव- राज -नारायण राणे एकत्र आले असते तर…’; नितेश राणेंचा गौप्यस्फोट



 मुंबई | जनआशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं. शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात झालेल्या वादाचे परिणाम हे संपुर्ण महाराष्ट्रावर झाले. पण शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात हा वाद आहे तरी काय? तो कसा सुरू झाला, यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेतीलचं काही नेते हे या वादाला कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नारायण राणे हे एकत्र आले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असलं असतं. पण उद्धव ठाकरे काही वाईट लोकांचं ऐकत आहेत. नारायण राणे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे संबंध बिघडवण्याचं काम संजय राऊत यांनीचं केलं आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावर संजय राऊत हे काम करत आहेत. शिवसेनेतील नेत्यांनीचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावली आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

आमच्या दवाखान्याच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांंचं चांगल बोलणं झालं होतं. मी आणि आदित्य ठाकरे यांनी काही गोष्टींवर चर्चा सुद्धा केली. त्यांनी मला शुभेच्छा देखील दिल्या. आमच्यातील हे नातचं सेनेच्या अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत यांना खुपलं. त्यांनी आमच्याविरूद्ध उद्धव ठाकरे यांचे कान भरले, असंही नितेश राणे हे म्हणाले आहेत. लोकमतच्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये असताना सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांच्यावर टीका केली. हे उद्धव ठाकरे यांना महिती असायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांना कोण जवळचं हे कळायला हवं? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भविष्यासाठी हे सर्व महत्वाचं आहे, असंही नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी लोकमतच्या एका मुलाखतीत आपलं स्पष्ट मतं मांडलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post