“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”


 

मुंबई | किरीट सोमय्या नावाचा सध्या महाराष्ट्रात दरारा निर्माण झालेला दिसत आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर सात्त्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना कोल्हापूरला निघालेल्या सोमय्यांना कराड मध्ये अडवण्यात आलं होतं. त्यावर आता शिवसेनेने टीका केली आहे.

हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर फार जुनं आहे. सोमय्या यांच्या आरोपांमागे चंद्रकांत पाटील आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. हसन मुश्रीफ यांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ईडीला सामोरं जाताना मुश्रीफ यांच्या तोंडाला फेस येईल म्हंटलं होतं. यावर मुश्रीफ यांची बाजू घेताना शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोथरूडमध्ये विजय मिळवताना पाटील यांच्या तोंडाला पण फेस आला होता, या शब्दात सामना अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ म्हणजे कोल्हापूरचा पैलवान आहेत. ते कोणालाच ऐकणार नाहीत. किरीट सोमय्या यांना पळून जावं लागलं आहे. असं म्हणत शिवसेनेने मुश्रीफ यांना समर्थन दिलं आहे. उठ की सुट काही बोलायचं, कोणावरही आरोप करायचे, झोपताना आरोप, उठताना आरोप या शब्दात सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे. मुश्रीफ यांच्या वादात आता शिवसेना मुश्रीफ यांच्यासोबत दिसत आहे.

दरम्यान, कोल्हापूर म्हणजे राजकारणाची सुपीक जमीन आहे. हसन मुश्रीफ राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. कोल्हापूरात त्यांच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. वातावरण चिघळण्याची चिन्ह दिसताच कोल्हापूर प्रशासनाने सोमय्या यांना जिल्हाबंदी केली म्हणून मोठा गोंधळ टळला आहे, असंही या अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post