गडकरींनी बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाला तडे, पंकजा मुंडे म्हणतात…



 मुंबई | केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं होतं. गडकरींनी पत्र लिहीत राज्यातील रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात शिवसेनेचे कार्यक्रते कामात अडथळा निर्माण करत आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात बऱ्याच वाद रंगला होता. आता रस्त्याच्या दर्जाबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरींना पत्र लिहिणार आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गला काम पुर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या असल्याचं म्हटलं आहे. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही. तात्काळ दखल घेतली जाईल, असं पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय दळणवळण खात्यामार्फत देशभरासह राज्यात रस्त्यांचे जोरात कामे सुरू आहेत. राज्यात दरवर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण ते पंढरपूर अशी  आषाढी वारी निघत असते. हा पैठण ते पंढरपूर असा वारीमार्गाच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाचं काम पुर्णत्वास जाण्याचं बाकी असतानाच रस्त्याला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत.

दरम्यान, गडकरींनी मागील दोन दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे मुंबई ते दिल्ली दरम्यान सुरू असलेल्या कामाचा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गडकरींनी आढावा घेतला आहे. तसेच कामाच्या दर्जाबाबत त्यांनी आदेश दिले आहेत. गडकरींनी रस्त्यांचे कामं दर्जेदार असावेत असं अनेकदा कार्यक्रमा दरम्यान बोलून दाखवलं आहे. आता त्यांनीच बांधलेल्या रस्त्याला भेगा पडल्याची तक्रार भाजपकडून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post