बीड | मराठवाड्यात पावसाने थैमान घातलं आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतजमिनी, अनेक घरं, जनावरं तसेच उभ्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी साचलेलं दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मदतीचं आश्वासन देणं हा काय माझा विषय आहे का एक प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले आहे. राज्य सरकार हे आई-वडिल असतात, तर केंद्र सरकार आजी आजोबा असतात. त्यामुळे केंद्राकडून मदत येईलच तो मुद्दा वेगळा पण राज्य सरकारने आई वडिलांची भूमिका पार पाडावी, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
राज्य आणि केंद्राच्या भूमिकेत सामान्य जनता भरडली जात आहे. मी कोणत्याही पक्षाच्या भूमिकेविषयी भाष्य करत नाहीये. तुम्ही बसलाय त्या खुर्चीची ताकद मोठी आहे. आपण खुर्चीवर बसल्यावर दुसऱ्यांना दोष देऊ नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, खुर्चीची ताकद मोठी आहे, त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवू नका, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री जनतेला लवकरच दिलासा देतील, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Post a Comment