मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारीत निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे हिने मुलींमध्ये बाजी मारली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वन सरंक्षक, गट-अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील एकूण 100 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काही निकाल राखून ठेवला आहे. वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 4 पदांचा तसेच अन्य तीन पदांचा निकाल प्रशासकिय कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य एका उमेदवाराचा निकाल देखील राखून ठेवला आहे. त्यामुळे या पदांची यादी तसेच निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांची नावे नंतर जाहीर करण्यात येतील.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी आयोगाने उफलब्ध करून देण्यात आला आहे. एमपीएससीने 413 पदांचा निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थी समाधानी झाले आहेत. कारण गेल्या दोन वर्षापासून या निकालाची वाट विद्यार्थी करत होते.
Post a Comment