मुंबई | आगामी निवडणुकांमुळे राजकीय वर्तुळात रणधुमाळी पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या ठाकरे सरकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. यातच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खड्ड्यांची दुरुस्ती आणि उपाययोजनांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
वर्षा निवासस्थानी बुधवारी घेतलेल्या बैठकीत रस्त्यांची झालेली वाईट अवस्था पाहता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कंत्राटदारांना चांगलंच सुनावलं आहे. रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही मात्र निधीचा उपयोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केलेला आढळल्यास कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. तसेच जबाबदार अधिकाऱ्यावरही तात्काळ कारवाई केली जाईल, असं निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा थेट इशारा दिला आहे. तसेच कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तर त्याच्यात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्त्यांचा आढावा बैठक घेतली.
Post a Comment