नवी दिल्ली | सध्या युएईमध्ये इंडीयन प्रिमियर लीगचा धुमाकूळ चालू आहे. कोरोनामुळे आपल्या देशात ही स्पर्धा खेळवता आली नाही. आयपीएल 2021 मध्ये अजून प्ले ऑफमध्ये कोणते संघ जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. अशातच विराट कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
विराट कोहली भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूमध्ये गणला जातो. मागील काही काळापासून कोहलीला त्याच्या लौकीकास साजेशा खेळ दाखवता आला नाही. 2019 पासून कोहलीने क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात शतक झळकावलेलं नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता विराटने भारतीय संघाच्या मर्यादीत क्रिकेट संघाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय ट्वेंटी संघाच्या राजीनाम्यानंतर कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा या आयपीएल नंतर राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोहली हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. पण त्याला आयसीसी आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धांची विजेतेपदं पटकावता आली नाहीत.
आरसीबी हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी भरलेला संघ असतानाही विराटला विजेतेपद पटकावता आलं नाही. आयपीएल 2021 मध्ये मात्र विराटचा संघ जोमात आहे. सध्या गुणतालिकेत आरसीबी 7 सामन्यात 10 गुणांसह तीसऱ्या स्थानावर आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा हंगाम असल्यानं विजेतेपद मिळवण्यास आरसीबी उत्सूक आहे.
Post a Comment