नवी दिल्ली | फॅमिली मॅन या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा बॉलिवुड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज वाजपेयी केरळ येथील चित्रपटाची शूटिंग सोडून तो दिल्लीकडे रवाना झाला आहे.
मनोज वाजपेयींनी त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही आहे. परंतु त्याच्या परिवारातील एका सदस्यांनी वडिलांची तब्येत बिघडली असल्याचं सांगितलं आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी मी बिहार येथून दिल्लीत आलो. त्यानंतर दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. माझ्या वडिलांची मी पदवीपर्यंत शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती. त्याचबरोबर अभिनयाचे स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊ नये अशीही त्यांची इच्छा होती. त्यानंतर मला त्यांचं स्वप्न साकार करायचं असल्यानं कशीबशी मी पदवी प्राप्त केली, असं मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत वडिलांची आठवण सांगितली होती.
दरम्यान, मनोज वाजपेयींनी 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सत्या’ या चित्रपटामधून बॉलिवुडमध्ये प्रदार्पण केलं. त्यावेळी सहाय्यक अभिनेता या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालं होतं. तर 2019 मध्ये मनोज वाजपेयींनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पूरस्कार पटकावला होता. सत्यमेव जयते, तांडव, अय्यारी, जय हिंद, तेवर, अशा हिंदी चित्रपटांमध्ये तसेच वेबसीरिजमध्ये देखील वाजपेयींनी काम केलं आहे.
Post a Comment