Corona Update : जिल्ह्यात ५ हजाराहून अधिक रुग्ण उपचाराधीन, आज किती रुग्णांची भर?

 


अहमदनगर | जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार १७० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये १४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३१७ आणि अँटीजेन चाचणीत २०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ३५, जामखेड ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०६, पारनेर ४२, पाथर्डी १२, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर २१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत १२, कोपरगाव ०६, नगर ग्रा.३९, नेवासा २९, पारनेर २०, पाथर्डी ११, राहाता ६३, राहुरी ०२, संगमनेर ५०, शेवगाव २८, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १४ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले १६, जामखेड ०८, कर्जत १९, कोपरगाव १७, नगर ग्रा. १०, नेवासा ०२, पारनेर २८, पाथर्डी १०, राहाता ०६, राहुरी २२, संगमनेर ३३, शेवगाव १४, श्रीगोंदा ०९ आणि श्रीरामपुर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले ६३, जामखेड १५, कर्जत ३४, कोपरगाव ४१, नगर ग्रा. ३०, नेवासा २२, पारनेर ५६, पाथर्डी १९, राहाता ५४, राहुरी २६, संगमनेर १८४, शेवगाव ३१, श्रीगोंदा ७८, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : ३,२६,२९९

उपचार सुरू असलेले रूग्ण : ५१७०

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६७१८

एकूण रूग्ण संख्या : ३,३८,१८७

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post