IT कर्मचाऱ्यांची दिवाळी! आठवड्यातून 3 दिवस सुट्टी अन् 4 दिवस काम


 

मुंबई | अधिक उत्पादनक्षम काम होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसाठी पुरेशी विश्रांती आणि आनंदी मन हे खूप महत्वाचं आहे. याच गोष्टीचा विचार करून आता काही आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी देण्याच्या विचारात आहेत. म्हणजे या कर्मचाऱ्यांना केवळ आठवड्यातील चार दिवस काम करावं लागणार आहे.

सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी सिक्युरिटी ही गेल्या सात महिन्यांपासून शुक्रवारी बंद ठेवण्यात येत आहे. जर कंपनीच्या या प्रयोगामुळे कामगार अधिक उत्पादनक्षम काम करत असतील आणि ते अधिक आनंदी राहत असतील तर ही कंपनी आपल्या मुंबईतील ऑफिसमध्ये चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टीचं धोरण राबवणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बहुतांश आयटी कंपन्यांनी एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेनुसार आयटी कंपन्यांतील 80 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी आठवड्यात चार दिवस काम करण्यासाठी इच्छुक आहेत. मग या दिवशी त्यांना अधिक वेळ काम करावं लागलं तरी त्यांची हरकत नाही.

काही आयटी कंपन्यांनी हे धोरण चालू देखील केलं आहे. हे धोरण आयटी क्षेत्रातील सर्वच कंपन्यांनी चालू केलं तर हे कंपनी आणि कर्मचारी दोघांसाठी फायद्याचं ठरेल. परंतु आठवड्यातील 4 दिवस कर्मचाऱ्यांना अधिक वेळ काम करावं लागणार आहे.

Previous Post Next Post