LPG सिलेंडरचा दरात पुन्हा वाढ; मोजावे लागणार 'इतके' रुपये

 


दिल्ली | Delhi

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे. इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. (LPG Gas Cylinder Hike)

15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला (LPG cylinder Price Hike) आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.

दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG Cylinder चा दर 884.50 रुपये इतका झाला आहे. 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी (non-subsidized LPG) आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post