TVS Star City Plus vs Hero Splendor Plus: कोणती बाईक देते ८६ किमी प्रति लीटर मायलेज; जाणून घ्या

 


देशातील दुचाकी क्षेत्रामध्ये कमी किंमतीच्या आणि जास्त मायलेजच्या बाईकची विस्तृत श्रेणी आहे. ज्यामध्ये बजाज, हिरो, टीव्हीएस आणि होंडा सारख्या प्रमुख वाहन उत्पादकांच्या बाईक्सला सर्वाधिक मागणी आहे. आपल्यालाही मायलेज बाईक खरेदी करायची असेल पण बाजारात उपस्थित असलेल्या बाईकपैकी कोणती घ्यावी हे ठरवता येत नसेल तर ही माहिती आवर्जून वाचा. तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या आणि अधिक मायलेज फीचर देणाऱ्या टीव्हीएस स्टार सिटी प्लस आणि हिरो स्प्लेंडर प्लस या दोन बाईक्सची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला बाईकची किंमत, फीचर्स, मायलेज आणि वैशिष्ट्यांचे संपूर्ण तपशील पहा.

हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus)

हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची एक शक्तिशाली आणि सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे, जी मायलेज आणि स्टाईलसाठी चांगलीच पसंत केली जाते. कंपनीने तिचे तीन प्रकार बाजारात आणले आहेत. या बाईकमध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन दिले आहे जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ९.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन ४ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात आले आहे.बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८०.६ kmpl चे मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची किंमत ६३,७५०रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये ६९,५६० रुपयांपर्यंत जाते.

टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus)

टीव्हीएस स्टार सिटी प्लस त्याच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे, जी मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने या बाईकचे दोन प्रकार बाजारात आणले आहेत. बाईकला सिंगल सिलेंडर १०९.७ सीसी इंजिन देण्यात आले आहे जे एअर-कूल्ड ईटी-एफआय इको थ्रस्ट इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.१९ PS ची पॉवर आणि ८.७ Nm चा टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकला ४ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे असा बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे.ही बाईक एका लिटर पेट्रोलवर ८६ किमीचे मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची किंमत ६८,४७५ रुपये आहे, जी टॉप मॉडेलवर गेल्यानंतर ७०,९७५ रुपयांपर्यंत जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post